प्रकाशचित्रणाच्या इतिहासाचा विचार करता प्रकाशचित्रणाचा शोध लावण्याचे श्रेय कोणा एका व्यक्तीकडे जात नाही. फोटोग्राफीच्या निर्मितीमध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले.अणि त्याकरीता शास्त्र विषयाच्या विविध शाखांची मदत घ्यावी लागली. जसे पदार्थविज्ञान, रसायन,अभियांत्रिकी इत्यादी.लॅटीन भाषेतील ’ कॅमेरा’ या शब्दाचा अर्थ " अंधारी खोली " असा आहे.१०व्या-११व्या शतकातील अलहसन (इराण) यांच्या लिखाणात या अंधा-या खोलीचा उल्लेख सापडतो.खोलीच्या दाराच्या छिद्रातून आलेल्या प्रकाशामुळे भिंतीवर उलटी आणि खरी प्रतिमा मिळते.प्रत्येकवेळी हव्या त्या दृष्याउढे खोली नेणे शक्य नाही.या अडचणीतून कॅमेरा ऑब्स्कुरा ची निर्मिती झाली.गिलोलार्मो गार्डीनो याने लेन्स बसविली. दृष्य जेवढे मोठे असेल व हवे असेल तेवढ्या मोठ्या आकाराचा कॅमेरा बनवावा लागत असे.पुढेपुढे अनेक प्रयोगातून सहज हाताळण्याजोगा म्हणून आज जे कॅमेरे बाजारात उपलब्ध आहेत यांची निर्मिती झाली.एकमेकांत घट्ट बसणा-या दोन पेट्या ,एका पेटीला भिंग,दुस-या पेटीला स्क्रीन मागे पुढे करण्याची सोय, अश्या अधिक सुधारणा होत गेल्या.१६ व्या शतकात ४५ अंशाचा कोनात आरसा बसवून चित्रपेटीच्या पृष्ठभागावर प्रतिमा घेता येण्याची सोय झाली.मिळालेले चित्र कायम करण्यासाठी रसायनतज्ञ पुढे आले.
अॅन्जेलो सोला (१६१४) याच्या सिल्व्हर नायट्रेट सुर्यप्रकाशात काळे पडते हे लक्षात आले.१९व्या शतकात थॉमस वेजवूज याने निगेटीव्ह प्रिंटचा शोध लावला.फ्रान्सच्या जोसेफ निबसेने १८२० मध्ये काचेवर सुप्त प्रतिमा मिळवली.तेव्हा त्यास वेळ ४ ते ८ तास लागत असे. डॅग्युरर याने १८३७ साली प्लेट कॅमेराची पद्धत अवलंबविली. त्यामुळे हा लागणारा वेळ ५ ते ४० मिनीटांवर आला.त्याला डॅग्युरर टाईप फोटो म्हणून प्रसिद्धी मिळाली. जोसेफ पेटझवल्ड याने डबल लेन्स लावून प्रकाशाची तीव्रता वाढवली आणि ही वेळ १ मिनीटांवर आणली.
इंग्लिश शास्त्रज्ञ हेन्री फॉक्स टॅलबोट (१८८०) याने चित्रांच्या प्रतिकृती काढण्याचे तंत्र कार्यवहीत आणले. त्याला आधुनिक प्रकाशचित्रणाचा जनक म्हणतात. याच काळात सर जॉन हर्षल याने फोटोग्राफ या शब्दाचा प्रथम वापर केला. निगेटीव्ह पॉझिटीव्ह हे शब्द प्रथम प्रचारात आणले. सन १८५१ मध्ये कलोडीनचा वापर होऊ लागला.कलोडीन म्हणजे इथर आणि अल्कोहोलचे मिश्रण.ही प्लेट ओली असतानाच कॅमे-यात बसवत असत.म्हणून त्याला ’वेट प्रोसेस’ म्हणतात.नंतर १८७१ मध्ये जिलेटीनचा शोध प्रो. रिचर्ड मेडॉक्स याने लावला.त्यामुळे एकूण प्रक्रीयेला गती आली आणि वेट प्रोसेसची जागा ड्रायप्लेट ने घेतली.ग्लासप्लेट ने-आण करण्यास अतिशय जड म्हणून ’इस्टमन’ या अमेरीकन माणसाने सेलोलाईडचा उपयोग केला. (१८८८) इमल्शन तयार करण्याच्या पद्धतीत बरीच सुधारणा झाल्यामुळे फोटो घेण्यास लागणारा वेळ १ मिनीटांवरुन १/१००० सेकंद इतका कमी झाला. भिंगाची प्रकाश ग्रहण करण्याची शक्ती वाढली. वेगवान भिंगे तयार होऊ लागली.पीन होल कॅमे-याचे दीवस मागे पडले.रंगीत फोटोला अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले. अश्या प्रकारे अनेकांच्या हातभाराने, त्यांनी केलेल्या प्रयोगांनी प्रकाशचित्रणाचा इतिहास घडत गेला.
वा!
ReplyDeleteकल्पना छान!
सुरूवात छान!
मस्त!आवडलं !!
ReplyDeleteमस्त!
ReplyDeleteआता आपण किती सहजपणे फोटो काढतो ना?
आम्ही नवीन कॅमेरा घेतल्यापासून भरपूर फोटो काढतोय, तेही अगदी सहजपणे! वडगाव दौर्याच्यावेळी आम्हाला या सवयीचा बराच तोटा झाला..एकच रोल पुरवून पुरवून वापरावा लागला, फक्त [?] ३६ फोटो!... असो,
माहिती मस्त!
गिलोलार्मो गार्डीनो,अॅन्जेलो सोला,हेन्री फॉक्स टॅलबोट, सर जॉन हर्षल इ. सगळेच किती ग्रेट होते ना?
- मुक्ता
वा! छान, दीपाताई.
ReplyDeleteपण आम्हाला भूतकाळ सांगणे म्हणजे पालथ्या घड्यावर पाणी!
त्यापेक्षा वर्तमानातली प्रात्यक्षिके उत्तम. कॉफी, आप्पे, पुपो यांच्या बरोबर ती लगेच गळी उतरतात. तेव्हा त्यांचा विचार व्हावा.