Friday, 9 September 2011

बेसिक सेटींग्ज ऑफ कॅमेरा

छायाचित्र घेण्यापूर्वी कोणत्याही कॅमे-यात प्रामुख्याने तीन गोष्टींचा विचार करावा लागतो.

१) शटरस्पीड २) अ‍ॅपरचर ३) फोकसिंग

शटरस्पीड

शटरस्पीडमुळे पडणा-या प्रकाशाच्या वेळेवर बंधन येते.शटर उघडून प्रकाश आत गेल्यावर परत शटर बंद होणे या क्रीयेला शटरस्पीड असे म्हणतात.साध्या बॉक्स कॅमे-यात हे शटरस्पीड एकच एक किंवा फारतर काहींना दोन असतात.पण आत्ताच्या कॅमे-यांना ही शटरस्पीड तीन, चार पासून आठ ते दहा अशी असू शकतात.याचे आकडे एकका नॉबवर आपल्याला दीसतात.जसे एक दोन चार आठ वैगरे.प्रत्यक्षात हे आकडे जरी पूर्णांकात असले तरी हे सेकंदाचा भाग दर्शवतात. म्हनजे नॉब वरचा ३० हा आकडा लावला असता शटर उघडून बंद होण्याची क्रीया १/३० सेकंद इतकी असते.छेदाचा आकडा जेवढा मोठा तेवढे शटरस्पीद जास्त वेगानेकार्यान्वित होते. छेदाचा आकडा लहान तेवढे शटरस्पीड स्लो होते.आजकालच्या कॅमे-यात B,1,2,4,8,15,30,60,125,250,500,1000.असे साधारणपणे आकडे असतात.प्रत्येक आकडयाचा एकमेकांशी संबंध असतो.जसजसा आकडा लहान प्रकाशाचा वेळ दुप्पट होतो.आकडा मोठा तसा प्रकाशाचा वेळ निम्म्याने होतो.जसे ६० आकड्याच्या जागी ३० आकडा वापरला तर प्रकाशवेळ दुप्पट होईल.
संख्या शास्त्राप्रमाणे १/१५ सेकंद १/८ च्या निम्मे नाही तर १/१२५ सेकंद हे १/६० च्या निम्मे नाही पण कॅमेरा करणा-यांनी सोय म्हणून हा बदल केला आहे.प्रकाशदर्शनात (exposure) ह्यामुळे काहीही फरक पडत नाही.काही कॅमे-यात T व B ही शटरस्पीड असतात.B मध्ये कॅमे-याचे बटण दाबताच शटर उघडते व बटणावरील बोट काढताच शटर बंद होते.T मध्ये बटण दाबताच शटर उघडते व दाब काढला तरी शटर बंद होत नाही. पुन्हा शटर बंद करण्याकरीता बटण पुन्हा दाबावे लागते.

1 comment:

  1. बापरे! यासगळ्या गोष्टी फोटो काढताना होतात?
    कमालच आहे! १००० आकड्याचा कॅमेरा कसं काम करत असेल?
    अ‍ॅपरचर
    फोकसिंग
    यांची माहिती पुढच्या ब्लॉगमधे येणार आहे का?

    - मुक्ता
    ता.क. तुझा ब्लॉग वाचल्यावर प्रत्येक वेळी मी कॅमेरातून फोटो काढून
    बघणार आहे....

    ReplyDelete